मारुतीची आरती

॥ श्री ॥

सत्राणे उद्दाणे हुंकार वदनीं । करि डळमळ भूमण्डळ सिन्धु जळ गगनीं ॥
कडाडिले ब्रह्माण्ड धाके त्रिभुवनीं । सुरवर नर निशाचर त्या झाल्या पळणी ॥ १
जय देव जय देव जय श्री हनुमंता । तुम्चेनी प्रसादे न भी कृतांता ॥ जयदेव जयदेव
दुमदुमलीं पाताळें उठिला प्रतिशब्द । थरथरिला धरणीधर मानीला खेद ॥
कडकडले पर्वत उद्दणउच्छेद । रामीं रामदासा शक्तिचा शोध ॥ २
जय देव जय देव जय श्री हनुमंता । तुम्चेनी प्रसादे न भी कृतांता ॥ जयदेव जयदेव

टिप्पण्या

Popular

श्री हनुमान चालीसा

श्री बजरंग बाण

संकट मोचन हनुमानाष्टक