शंकराची आरती
लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ।। विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा ।।
लावण्य सुंदर मस्तकीं बाळा ।। तेथुनिया जळ निर्मळ वाहे झुळझुळा ।। १ ।।
जय देव जय देव जय श्री शंकरा , ओ स्वामी शंकरा ।। आरती ओवाळून तुज कर्पुरगौरा ।। जय देव जय देव ।।
कर्पूर गौरा भोळा नयनीं विशाळा ।। अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा ।।
विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा ।। ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। २ ।।
देवीं दैत्यी सागर मंथन पै केले ।। त्यामाजी अवचित हळाहळ सापडले ।।
तें त्वांसूरपणे प्राशन केले ।। नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ।। ३ ।।
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।। पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।।
शतकोटींचे बीज वाचे उच्चारी ।। रघुकुळ टिळक राम दासा अंतरी ।। ४ ।।
विभूतीचे उधळण शितिकंठ नीळा ।। ऐसा शंकर शोभे उमावेल्हाळा ।। २ ।।
जय देव जय देव जय श्री शंकरा , ओ स्वामी शंकरा ।। आरती ओवाळून तुज कर्पुरगौरा ।। जय देव जय देव ।।
देवीं दैत्यी सागर मंथन पै केले ।। त्यामाजी अवचित हळाहळ सापडले ।।
तें त्वांसूरपणे प्राशन केले ।। नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले ।। ३ ।।
जय देव जय देव जय श्री शंकरा , ओ स्वामी शंकरा ।। आरती ओवाळून तुज कर्पुरगौरा ।। जय देव जय देव ।।
व्याघ्रांबर फणिवरधर सुंदर मदनारी ।। पंचानन मनमोहन मुनिजनसुखकारी ।।
शतकोटींचे बीज वाचे उच्चारी ।। रघुकुळ टिळक राम दासा अंतरी ।। ४ ।।
जय देव जय देव जय श्री शंकरा , ओ स्वामी शंकरा ।। आरती ओवाळून तुज कर्पुरगौरा ।। जय देव जय देव ।।
Download
Download
Right click and choose"Save Target/Link as"
टिप्पण्या