संध्याकाळचे श्लोक .... शुभम करोति 🙏
हात , पाय, तोंड स्वच्छ धून पुसून देवघराची थोडी सफाई करावी । मग तेलाचा दिवा लावावा । उदबत्ती किंवा धूपबत्ती लावावी । देवघरातली घंटा वाजवून हा श्लोक म्हणावा । घरातले सगळे जण एकत्र येऊन श्लोक म्हटले कि तेचि वेगळीच मजा ।
शुभम करोति कल्याणम आरोग्यम सुख संपदा ।
शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमोस्तुते ।। १ ।।
दीपज्योति परब्रम्ह दीपज्योर्तिजनार्दनः ।
दिपो हरतु मे पापं संध्यादीप नमोस्तुते ।। २ ।।
दिव्या दिव्या दीपत्कार कानीं कुंडले मोतीहार ।
दिव्याला पाहून नमस्कार ।। ३ ।।
तिळाचे तेल कापसाची वात । दिवा जळो मध्यानरात ।
दिवा लावला देवांपाशी । उजेड पडला तुळशीपाशी ।
माझा नमस्कार देवाधिदेवा तुमच्या चरणांपाशी ।। ४ ।।
सर्वलहानांनी मोठ्यांचे पाय शिऊन आशीर्वाद घ्यावा । मनात वेगळ्या स्फूर्ती चा संचार होतो ।
मनाचे श्लोक (१ ते १०) पण म्हणूशक्ता
टिप्पण्या