देवी ची आरती | दुर्गेमाता ची आरती

।। श्री ।।

दुर्गे दुर्घट भारी तुजविण संसारीं ।। अनाथनाथे अंबे करुणा विस्तारी ।।
वारीं वारीं जन्ममारणातें वारीं ।। हारी पडलों आता संकट निवारीं ।। १ ।।

जयदेवी जयदेवी जय महिषासुरमथिनी ।। सुरवरईश्वरवरदे तारक संजीवनी ।। जयदेवी जयदेवी 
 
त्रिभुवनभुवनीं  पहातां तुजऐसी नाहीं ।। चारी श्रमले परंतु न बोलवे काहीं ।।
साही विवाद करितां पडले प्रवाहीं ।। ते तूं भक्तांलागीं पावसि लवलाही ।। जय० ।। २ ।।

प्रसन्नवदने प्रसन्न होसी निजदासा ।। क्लेशां पासुनि सोडवी तोडीं भवपाशा ।।
अंबे तुजवांचून कोण पुरविल आशा ।। नरहरि तल्लिन झाला पदपंकजलेशा ।। जय० ।। ३ ।।
 

टिप्पण्या

Popular

श्री हनुमान चालीसा

श्री बजरंग बाण

संकट मोचन हनुमानाष्टक